Share

नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद असणार याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत.

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे असे आदेश मंत्रालयातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी नव्याने काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. दरम्यान, बाजारपेठांतील बहुतांशी घटकांकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने गोंधळात भर पडत आहे. नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद असणार याबाबत मोठा संभ्रम निर्माण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

या गोंधळाबाबत आता व्यापारी मंडळांकडून मुख्यमंत्र्यांपासून विविध नेत्यांच्या भेटीदेखील घेण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपला निषेध नोंदविण्यात येणार आहे. हे सगळे शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!