Share

नागपूरकरांच्या प्रेमावर तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : तुकाराम मुंढेंची बदली रद्द झाल्याचे काळताच नागपूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रत्येकाला मुंढे नागपुरातच राहणार असे वाटायला लागले. अनेकांनी तर मुंढे नागपुरात जिल्हाधिकारी म्हणून येत असल्याच्या अफवेला देखील खतपाणी घातले कारण रवींद्र ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र मुंढेंच्या बदलीचा शासकीय आदेश रद्द झालेला नसून त्यांचे केवळ पोस्टिंग रद्द झाले असल्याचे नागपूरकरांना कळाले आणि आनंदावर विरजण पडले.

काल भल्यासकाळी तपस्या या शासकीय निवासस्थानाबाहेर मुंढेंच्या समर्थनात नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे नागपूर शहराला वाचवा असे फलक देखील अनेकांच्या हाती बघायला मिळाले. काहींनी वंदे मातरम तर काहींनी भारत माता की जयचे नारे लगावले. मुंढेंवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला. विशेष म्हणजे शहरात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने पसरते आहे. मुंढे स्वतः शासनाच्या नियमनाचे पालन करा, असे देखील सांगत आहेत तरीही नागरिकांची ही गर्दी बघायला मिळाली याच सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

अखेर काल नागपूरकरांचा निरोप घेऊन तुकाराम मुंढे मुंबईत दाखल झाले. त्यांनी निघतानाच नागपूरकरांच्या प्रेमाचा भावनिक होऊन हात जोडत नम्रपणे स्वीकार केला होता. यानंतर त्यांनी आज ‘धन्यवाद… हे देखील पुरेसे नाही, पूर्णपणे नम्र’ असे ट्विट केले आहे.

दरम्यान, मुंढे हे आता विनापदाचे असून त्यांच्यासाठी नवीन पोस्ट शोधली जात असल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहेत. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली.

महत्वाच्या बातम्या:-

आरोग्य सेवा कोडमडली असताना प्रशासन ‘जम्बो कोविड रुग्णालया’चे कागदी घोडे नाचवित आहे का?

परीक्षा पद्धत साधी व सोपी, विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नये- प्राजक्त तनपुरे

भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत, सचिन सावंतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पुन्हा उसळणार : खामगावात मराठा समाजाचा एल्गार…

एकनाथ खडसेंकडे जी काही माहिती आहे त्यांनी ती जनतेसमोर आणावी : सचिन सावंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!