Share

आरोग्य सेवा कोडमडली असताना प्रशासन ‘जम्बो कोविड रुग्णालया’चे कागदी घोडे नाचवित आहे का?

Published On: 

🕒 1 min read

नागपूर :-जिल्ह्यात दररोज नव्याने दीड हजारांवरच्या संख्येने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, त्यातच शासकीय व खासगी रुग्णालयात खाटांची कमतरता भासत असतानाच प्रशासनाने केवळ घोषणा करून ‘जम्बो कोविड रुग्णालया’चे कागदोपत्रीच घोडे नाचविल्याचे दिसून येत आहे. एकीकडे आरोग्य सेवा पूर्णतः कोडमडली आहे. इतकेच काय तर मेयो, मेडिकल सोडल्यास शहरातील इतर शासकीय रुग्णालये हे आजही कोविड रुग्णांपासून दूर आहेत.

कोरोनाच्या या सहा महिन्यांच्या संकटकाळात याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लाईन व आवश्यक सोयीसुविधा उभ्या केल्या असता तर आज कोरोनाबाधितांवर उपचारासाठी दारोदार भटकंती घालण्याची वेळ आली नसली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये गत ११ मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात म्हणजे, मार्च, एप्रिल, मे, जून व जुलैमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव शहर व ग्रामीण भागामध्ये आटोक्यात होता.

परंतु ऑगस्टपासून व नंतर सप्टेंबरमध्ये तर याचा उद्रेकच दिसून येत आहे. परंतु या सहा महिन्यांच्या काळात प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचविल्याचे दिसून येत आहे. जवळपास ३५ लाख लोकसंख्येच्या उपराजधानी नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील १२00 खाटांचे कोविड हॉस्पिटल सोडल्यास प्रशासन दुसरे कुठलेच कोविड हॉस्पिटल उभे करू शकले नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.

सोळा ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे हजार खाटांचे ‘जम्बो कोविड रुग्णालय’ मानकापूर येथे उभारण्याची घोषणा केली. परंतु नंतर अधिकाऱ्यांनी या घोषणेला मनावर घेतले नाही. परिणामी, महिना होत असताना एक खाटही लागली नाही. कोरोनाचा रुग्णांशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात १६ ऑगस्ट रोजी जम्बो कोविड हॉस्पिटलच्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणे तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येते, अशी पुष्टीही पालकमंत्र्यांनी दिली होती. परंतु नंतर पुढे काय झाले, याचे उत्तर अद्यापही कुणाकडेच नाही.
मनपा रुग्णालय करते मेयो,

मेडिकलला रेफर मनपाच्या अखत्यारित असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयात जवळपास ३५0 खाटांची व्यवस्था, मनुष्यबळ, ऑक्सिजन लाईन सर्व व्यवस्था करण्यात आली होती. परंतु येथील डॉक्टर तेथे येणाऱ्या रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये रेफर करीत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे किती दिवस मेयो, मेडिकलवरच अवलंबून राहायचे, हेही समजण्यापलीकडचेच झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!