मुंबई : ठाकरे सरकार हे ‘उद्धट ठाकरे’ सरकार असून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न या सरकारच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे. पण मोदिजी आणि देवाच्या कृपेमुळे मी बचावलो, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. काल रात्री खार पोलीस ठाण्याबाहेर सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी देखील झाले होते. त्यानंतर त्याच अवस्थेत त्यांनी वांद्रे पोलीस स्टेशन गाठले होते. कालच्या संपूर्ण प्रकारानंतर किरीट सोमय्या यांनी मुलुंडमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत, संपूर्ण घटनेची माहिती दिली .
किरीट सोमय्या यांनी यावेळी थेट ठाकरे सरकारवर टीका करत, कालचा प्रकार म्हणजे पोलिसांच्या संगनमताने माझी हत्या करण्याचा कटच असल्याचा आरोप केला. माझा मनसुख हिरेन करण्याचा कट ठाकरे सरकारचा होता. आता पर्यंत मला तीन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. पण जनता माझ्यासोबत आहे. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत आहे. त्यामुळे माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. उद्धव ठाकरे सरकारला आम्ही पाहून घेऊ. मला मारणारा अजून जन्माला आला नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार आहेत. तसेच “राज्यात भाजप नेत्याविरुद्ध घडत असलेल्या घटनांची माहिती केंद्रीय गृह सचिवांना देऊ” असे किरीट सोमय्या म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :

