पुणे: भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून १९४७ या वर्षी स्वातंत्र्य मिळाले. १९४६ पासून १९५० पर्यंत भारतीय राज्यघटना आणि त्यातील तरतुदी निर्माण करायचं कार्य केलं गेलं आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राजघटना आणि त्याच बरोबर लोकशाही शासन पद्धत स्वीकारली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन होय.
लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रमणात सामान्य लोकांच्या सेवेत नेहमी हजार रहावे असा मतितार्थ लोकशाही शासन पद्धतीमधून काढता येतो. याच लोकशाही दिनाचे आयोजन पुणे महानगरपालिकेतर्फे ७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
७ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पुणे महानगरपालिका भवनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे सामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- अरेच्चा! शहनाज गिलची ‘ती’ स्टाईल अल्लू अर्जुनने तर केली नाही ना कॉपी?, पहाच व्हिडीओ
- दलितांवर पुन्हा पाण्यासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली
- “वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण…” एकनाथ खडसेंची टीका
- यूपीए सरकारने साखर कारखान्यांना कर्ज घेण्यास भाग पाडलं – सुजय विखे पाटील
- पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरात भाविकांची गर्दी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
