अमरावती: अमरावती जिल्ह्यातील सावंगी मग्रापूर गावातील दलित बहुल प्रभागात महिन्याभरापासून पाणी उपलब्ध होत नसल्याने भाजप आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुडेंना, हा गलथानपणा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा सवाल देखील केला. तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने मते मागता, परंतु त्यांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगत बसता. असा टोलाही लगावला.
अमरावतीतील सावंगी मग्रापूर गावात दलित बहुल प्रभागतील पाणी पुरवठा सरपंचांनी हेतुपुरस्पर बंद ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. जीवघेण्या थंडीत महिला गावाच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे ह्या महाविकास आघाडी सरकारने दलितांवर पुन्हा पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आणली आहे असे सातपुते यांनी म्हंटले. पुढे बोलताना ते म्हणाले, हा फक्त पाण्याचा प्रश्न नसून सरकारचा या समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा विषय आहे. पाणी नसल्याने अनेकांनी गाव सोडले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीची आदेश देऊन, सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर कारवाई करून दलितांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी केली.
वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागत आहे. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. धनंजय मुंडे हा प्रकार कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? आघाडीची सत्ता आली की दलित,वंचित, शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात. असे आरोप त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या:
- संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
- “मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका
- ‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
- ‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
- औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

