बीजिंग – कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा स्त्रोत शोधण्यासाठी अमेरिकेतील गुप्तचर संस्थांना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आदेश दिले आहेत.जगभरातील वैज्ञानिकांनी त्याचे स्वागत केले आहे . त्यावर नवनवे खुलासे दररोज पुढे येतात.या विषाणूचा जन्म चीनमधील प्रयोगशाळेतच झाला , असा दावा करणारा आणखी एक खुलासा पुढे आला आहे.
चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हा विषाणू वटवाघळापासून आल्याचा जगाचा समज होईल. मात्र, त्यांचे हे कारस्थान अपयशी ठरले आहे असा आरोप दोन संशोधकांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे चीनच्या विशावासार्हतेवर प्रश्नाचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे
एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला चीनची-विश्वासपात्र, तसंच प्रेम आणि आदर करायला पात्र अशी प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी केलं आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिनपिंग यांनी हे आवाहन केलं.
चीनचा इतर जगाशी असलेला संवाद आणि चीनची प्रतिमा सुधारली पाहिजे तसचं पाश्चात्य देशांनी तयार केलेल्या मतप्रवाहाचं युद्ध जिंकलं पाहिजे, असं जिन पिंग यांनी म्हटल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. दरम्यान चीनचं असं आवाहन म्हणजे चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडल्याची कबुलीच असल्याचं, विश्लेषकांचं मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल’
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- महेंद्रसिंह धोनी इंग्लंडच्या ‘या’ कर्णधारापेक्षा सरस; सलमान बट्टचा दावा
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली
- पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच आहे – पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

