Share

महेंद्रसिंह धोनी इंग्लंडच्या ‘या’ कर्णधारापेक्षा सरस; सलमान बट्टचा दावा

Published On: 

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मागील वर्षी १५ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. मात्र क्रिकेटमध्ये धोनीचे नाव आजही आदराने घेतले जाते. अनेकदा धोनीच्या नेतृत्वाची तुलना ही इतर कर्णधाराशी केली जाते. आता पाकिस्तानचा क्रिकेटपटु सलमान बट्टने धोनीची तुलना ही इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराशी केली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट्टने नुकत्याच दिलेल्या एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत महेंद्रसिंह धोनीची रणनीती ही इंग्लंडचा विश्वविजेता संघाचा कर्णधार इयान मॉर्गनपेक्षा सरस असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेचा दाखला देताना तो म्हणाला की,’२०१९ विश्वचषक स्पर्धेत जरी इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला तरीही कर्णधार म्हणून मॉर्गनची रणनिती ही योग्य नव्हती. क्रिकेटमध्ये जेव्हा रणनीती आखण्याची वेळ येते तेव्हा धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही’ असे सलमान बट्ट यावेळी म्हणाला.

पुढे बोलताना त्याने रोहित शर्माचे कौतुक करताना म्हणाला की, ‘आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्माची रणनीती देखील चांगली असते.’ सलमान बट्टच्या मते इंग्लंडचा संघ ३०० ते ३५० धावांचे लक्ष्य अरामात गाठु शकतो. मात्र जेव्हा धावांचा बचाव करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मॉर्गन हा सपशेल अपयशी ठरतो. इंग्लंडच्या संघाने इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली २०१९ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मॉर्गनने एकूण १२१ एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना ७२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!