Share

फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात थोड्याच वेळात पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होणार आहे. ही पहिली वनडे मॅच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. यावर विराटने प्रथम फलंदाजी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. थोड्याच वेळात एकदिवशीय सामन्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, भारताचे माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. लोकांच्या टीकेवर किंवा चर्चांवर बाहेरच्या गोष्टींवर थोडंस शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर किंवा याच्यापासून शक्य होईल तेवढं लांब रहा, असा सल्ला मांजरेकर यांनी विराटला दिला आहे.

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत के.एल. राहुल वरच्या टीकेसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर विराटने बाहेरच्या फालतू गोष्टी, असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय मांजरेकर यांनी ट्विट करुन विराटला खास सल्ला दिला आहे. अशा बाहेरच्या गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर, असं मांजरेकरांनी सांगितलं आहे.

मांजरेकर यांनी विराटला सल्ला देताना महेंद्र सिंग धोनीची आठवण काढली आहे. मांजरेकर म्हणाले, विराटने वस्तुस्थितीचा संयम आणि परिपक्वतेने स्वीकार करायला हवा, जसा धोनीने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!