Share

राष्ट्रपती राजवटीची मागणी तर महिन्यातून दोन-तीन वेळा होते,त्यात नवीन काय?

Published On: 

मुंबई – माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह यांनी पाठविलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.संजय राठोड प्रकरण,धनंजय मुंडे प्रकरण,महेबूब शेख प्रकरण राज्यात गाजत असताना  सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती.

या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत असून अनेक बैठकांचं सत्र सुरू आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.दरम्यान, या प्रकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. लोकसभेत शून्य प्रहरात गिरीश बापट, मनोज कोटक, पूनम महाजन, कपिल पाटील, नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.

याशिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील केली आहे.दरम्यान, ही मागणी जोर पकडत असताना आता मंत्री जयंत पाटील यांनी यामुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली आहे.

राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होते. महिन्यातून दोन तीन वेळा विरोधी पक्ष ही मागणी करतो. यात नवीन काही नाही, असं जयंत पाटील म्हणाले. अनिल देशमुख यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका बदलली, हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा केली, तपशीलात जाऊन तपासणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!