औरंगाबाद : वाळू माफियाकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना औरंगाबाद शहराचा तहसीलदार किशोर देशमुख याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या जालना पथकाने सोमवारी रात्री एमटीडीसी कार्यालय परिसरात ही कारवाई केली.
पंधरा दिवसांपूर्वी तक्रारदार आला होता, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली. त्यावरून वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून तहसीलदार देशमुख याने लाच मागितल्याचे म्हटले होते. त्यावरून, लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात देशमुख याने दीड लाख रुपये मगितल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी देशमुख याने पैसे घेताना तक्रारदाराला बऱ्याच ठिकाणी फिरवले. अखेर रात्री एमटीडीसी कार्यालय परिसरात पैसे घेताच शंका आल्याने देशमुख हा पैसे घेऊन कारमधून घराकडे पळाला. पथकाने विट्स हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रपती राजवटीची मागणी तर महिन्यातून दोन-तीन वेळा होते,त्यात नवीन काय?
- ‘तान्हाजी’ नंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटात झळकणार अजय-काजोलची जोडी
- शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला, फडणविसांचा टोला
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- “लोगों का काम है कहेना, बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना…”, कोहलीची के.एल. राहुलसाठी बॅटिंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

