Share

‘सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं !’ निर्दोष मुक्ततेनंतर भुजबळांच्या भावना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना  सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त करत त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवासही झाला होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

यानंतर छगन भुजबळ यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. ‘या प्रकरणात बिल्डरसह आम्हा सर्वांना एक नवा पैसा देखील मिळालेला नाही. उलट महाराष्ट्र सदनाची सर्वानीच वाह वाह केली आहे. मी जोरात बोलतो, योग्य बाजू मांडतो त्याचा विरोधकांना त्रास होत असेल त्यामुळेच ते माझ्यावर खोटे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ‘सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं !’ ‘ असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!