🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत मतभेदामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेतील अनेक बडे नेते उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. एकनाथ शिंदेंच संख्याबळ वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आता शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ट्विट केल आहे.
ट्विटमध्ये देसाई म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही, असं ते म्हणालेत. तसेच मुख्यामंत्री उद्धव ठाकरे देखील आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडून मातोश्रीला दाखल झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील गंभीर वक्तव्य केलं आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. मविआ सरकारला कोणताही धोका नाही. विरोधी पक्षात बसायची आमची तयारी आहे, असं देखील पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
