🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या दिशेने घडामोडी सुरु आहेत. शिंदे गटात आमदारांच संख्याबळ वाढताना दिसत आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पत्राचा आधार घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्या म्हणाल्यात कि, तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा, असं संजय राऊतांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज केलं आहे. ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत, असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
दरम्यान, याआधी बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. पत्रात म्हणालेत कि, आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच so called (चाणक्य कारकून) असा उल्लेख करत शिरसाट यांनी अप्रत्यक्षरीत्या संजय राऊतांवर निशाणा साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
