🕒 1 min read
पुणे : पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगेत अनेक गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांवर चढायला, मज्जा मस्ती करायला आणि इतिहास जाणून घ्यायला अनेक हौशी, नवखे किंवा अनुभवी ट्रेकर्स जात असतात. परंतु ही मंडळी काळजी घेताना फार कमी दिसतात. अश्यानेच जीवघेण्या दुर्घटना होतात आणि बऱ्याच जणांना जीव देखील गमवावा लागतो. अशीच काहीशी घटना पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात असणाऱ्या ढाक- बहिरी या सुळक्यावर घडली.
प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे 5 जण औरंगाबादहून ट्रेक आले होते. ट्रेकी सुरु झाल्यानंतर प्रतीक आवळे याचा तोल गेल्याने तो खाली पडला, त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. नाशिकमधील शेंडीच्या डोंगरावरून पडून दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील राजमाची किल्ल्या जवळ असणाऱ्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. तिथे आधीच आलेल्या दोघांनी प्रतीक खाली पडल्याची घटना डोळ्याने बघितली. त्यानंतर प्रशासनाने स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने इतर मित्रांना सुखरूप बाहेर काढले आणि कर्जत रेल्वे स्टेशन वरून घरी पाठवले.
महत्वाच्या बातम्या:
- अखेरचा हा तुला दंडवत… लतादीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू पण लता मंगेशकर यांच्या निधनाने व्यथित
- भारतीय क्रिकेट संघाची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
- संगीताच्या माध्यमातून लता दीदी सदैव आपल्यासोबत; डॉ. भागवत कराडांनी व्यक्त केल्या भावना!
- जेव्हा लता दिदींनी भारतीय क्रिकेट संघासाठी फ्री कॉन्सर्ट केला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
