🕒 1 min read
मुंबई : एकीकडे सर्वधर्म समभाव अशी आपली संस्कृती असली तरी, अनेक वेळा जात, धर्म तसेच सण साजरा करण्यावरून टिकेला सामोरे जावं लागतं. त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरला देखील बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच दिवाळी निमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा फरहानला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र, यावेळी फरहान या ट्रोल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई घेणार आहे.
दरम्यान फरहानने दिवाळीत लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लक्ष्मी पूजनाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये फरहान त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरच्या कपाळावर टिळक लावत आहे. तर त्याच्या कुटुंबातील काही सदस्य त्या फोटोत दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या या फोटोवर काही नेटकऱ्यांनी फरहान आणि त्याच्या कुटुंबाची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. या ट्रोलिंगला पाहता जावेद अख्तर म्हणाले, ती या द्वेषाने भरलेल्या कमेंटकडे दुर्लेक्ष करणे म्हणजे या ट्रोर्ल्सला खेळायला एक खेळणे देणे. त्यांच कुटुंब सहसा अशा ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही, पण आता ट्रोलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. याच कारणामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
https://www.instagram.com/p/CVza1MqM7kE/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर फरहान सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. मात्र त्याच्यावर केलेल्या टिकेमुळे आता दुर्लक्ष करणार नाही. एका वृत्तानुसार, अख्तर कुटुंब सर्व देवांच्या एकतेवर विश्वास ठेवतात आणि ट्रोल्सला त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. फरहान अख्तरचे वडील मुस्लीम आणि आई पारशी असल्याने तो ईदप्रमाणेच दिवाळी साजरी करतात. फरहान ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी फरहानचा ‘तूफान’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

