मुंबई : आगामी विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची पूर्वतयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ७ नोव्हें.रोजी दिल्लीत पार पडली. याच पार्श्वभूमीवर विविध विषयांवरून निशाणा साधत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हंटले आहेत की,’एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी ‘जॉइण्ट व्हेंचर्स’ करून ड्रग्जसंदर्भातले खेटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपापुरस्पृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपाचे भागभांडवल या उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतले आहे. हे असे पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल? जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे.’
दरम्यान, भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही? निवडणुकांसाठी पैसा येतो पुठून? केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या हुपुमावरून राजकीय दाबदबाव आणत असतात? हे विषय दुर्लक्षित करता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांचे इतके प्रदीर्घ काळ चाललेले आंदोलन कुणी पाहिले नसेल. आतापर्यंत ७०० च्या वर शेतकऱ्यांनी या आंदोलनात बलिदान केले, पण भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यावर दोन ओळींचे दुःख व्यक्त केले असे दिसले नाही. कुत्रा मेल्यावर दिल्लीतील नेते शोकसंदेश जारी करतात, पण शेतकरी आंदोलनात इतके लोक मरूनही लोकसभेत किंवा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शोक प्रस्ताव मंजूर होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या विषयावर दिल्ली सरकारचे कान उपटले आहेत.नवाब मलिक हे भाजपाने नेमलेले राज्यपाल आहेत, पण ते बेधडकपणे सत्य बोलले आहेत. जनभावना त्यापेक्षा वेगळ्या नाहीत’, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

