औरंगाबाद : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासुन इंग्रजी शाळा या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू असल्याने शाळांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना विश्वासात न घेता फी माफीचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. मागील महिन्यातच मेस्टा संघटनेने ज्या पालकांचा कोविड काळात रोजगार बुडाला नोकऱ्या गेल्या अशा पालकांना दिलासा मिळावा म्हणुन व त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतुने २५ टक्के फी माफीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाचा मेस्टा संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
परंतु शिक्षण मंञ्यांनी पुन्हा एकदा हा निर्णय जाहिर केला. परंतु या निर्णयास महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) कडाडून विरोध केला आहे. या निर्णयामुळे ज्या पालकांचे रोजगार शाबुत आहेत ज्यांचे उद्योगधंदे सुरळीत सुरू आहे. कारखानदार व सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी ज्यांच्या उत्पन्नावर कुठलाही परिणाम झाला नाही.
अशा पालकांना फी माफी का द्यायची शेवटी अशा पालकांनी फी भरली तरच गोरगरीब पालकांच्या पाल्यांना न्याय देता येईल. अन्यथा त्यांना देखील उर्वरीत ८५% फी भरण्याची सक्ती करण्याची पाळी संस्थाचालकांवर येईल. याचा शिक्षण मंत्र्यांनी विचार केलेला नाही. याकारणात्सव शिक्षणमंञ्यांनी जाहीर केलेल्या निर्णयास इंग्रजी शाळा संस्थाचालक मान्य करणार नाही. अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप
- फडणवीसांच्या भेटीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही भेट बंद दाराआड नाही; पुरामुळे दरवाजेच शिल्लक नव्हते’
- Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींना मिळणार आता घरीच लस
- संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
- ‘मी फक्त पॅकजची घोषणा करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

