Share

‘सामूहिक आत्मबलिदान’ करण्यास परवानगी द्या, पीएचडीधारक संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Published On: 

औरंगाबाद: २७ जुलै ते ०८ ऑगस्ट २०२१ दरम्यान शासनास जागे करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील गतिशीलता वाढविण्यासाठी नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती राज्यव्यापी स्मरण आंदोलन करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. ९ ऑगस्ट २०२१ रोजी नेट-सेट, पीएच.डी पात्रताधारकांना ‘सामूहिक आत्मबलिदान’ करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी देखील समितीद्वारे करण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांची १०० % पदे तात्काळ भरावीत, प्रचलित तासिका तत्व  धोरण बंद करावे तसेच शंभर टक्के भरती होईपर्यंत समान काम समान वेतन या तत्त्वानुसार सेवाशर्तीनुसार वेतन देण्यात यावे. विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार परिपत्रक दिनांक ७ व ८ मार्च २०१९ नुसार आरक्षणासाठी विभाग व विषय एकक न मानता विद्यापीठ व महाविद्यालय एकक मानून सहाय्यक प्राध्यापक भरती करण्यात यावी. या तीन मागणीसाठी २१ ते २७ जून २०२१ दरम्यान करण्यात आलेले बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते.

या पुकारण्यात आलेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनाची दखल घेत शासनाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची १००% पदे तात्काळ भरावीत. या पहिल्या मागणीला शासनातर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आश्वासन देत म्हणाले की २०१७ च्या आकृतिबंधानुसार रिक्त पदांच्या ४०% पदे भरण्याचा शासन निर्णय त्वरित काढणार, तसेच या पदाच्या ४०% जागादेखील दोन-तीन महिन्यात भरल्या जातील.

समितीच्या प्रचलित तासिका तत्व धोरण बंद करावे तसेच शंभर टक्के भरती होईपर्यंत समान काम समान वेतन या तत्त्वानुसार सेवाशर्ती नुसार वेतन देण्यात यावे या दुसर्‍या मागणीला शासनातर्फे ९ महिन्याचे त्वरीत मानधन अदा केले जाईल. प्रचलित तासिका तत्वाला पर्यायी व्यवस्था सुचविण्यासाठी संचालक उच्च शिक्षण डॉ. धनराज माने समिती गठीत करण्यात येईल. माने समिती रचनेत अध्यक्ष, ०१ सचिव सदस्य, ०३ शिक्षण तज्ञ, नेट-सेट,पीएच.डी धारक संघर्ष समितीचे सदस्य यांचाच समावेश असेल. आदी आश्वासन समितीतर्फे देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!