औरंगाबाद : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सायंकाळी कार्यकर्ते चक्क क्रेनने फुलांच्या हार घालण्याच्या वेळी जालना रोडवरील चिकलठाणा परिसरामध्ये चक्क एक तासभर वाहतूक ठप्प झाली. यामुळे वाहतूकधारकांना खुप मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चिकलठाणा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये चक्क राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फुलाच्या मोठा हार घालण्यासाठी क्रेन घेवून आले. दरम्यान शेकडो वाहनांची रांग लागल्याने वाहनधारक खुप वैतागले.
दररोज औरंगाबाद शहरातील वर्दलीचा रस्ता म्हणून जालना रोड समजला जातो. सायंकाळी शेंद्रा, चिकलठाणासह विविध, खासगी रुग्णालये, बँक, सहकारी बँक, खासगी कार्यालय सुटण्याची सायंकाळी वेळ असल्याने सायंकाळी खुप मोठी वर्दळ दररोज पहावयास मिळते. यावेळी तब्बल २ ते ३ किलोमिटर पर्यंत कामगारांसह, अधिकारी, सामान्य नागरिकांचे वाहन रस्त्यावर एकतास वाहतूक कोंडीमुळे उभे होते.
विनापरवानगी सत्काराचा कार्यक्रम
एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनला कोणतीही परवानगी मागितली नव्हती. त्यामुळे हा सत्कार समारंभ बेकायदेशीर घेतला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.
सत्कारावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती
या वेळी राष्ट्रवादी काँग्रे्सचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, माजी नगरसेवक ख्याजा शरफोद्दीन, मयूर सोनवणे, कय्यूम शेखसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश

