🕒 1 min read
बीड : संपूर्ण जिल्ह्यात कोरोना वाढत असल्यामुळे व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. यासाठी १५ मार्चची मुदत होती, परंतु केवळ चार हजार व्यापाऱ्यांनी चाचण्या केल्या. इतरांनी मात्र चाचणी न करताच दुकाने उघडल्याचे मंगळवारी समोर आले आहे. प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. दिवसभरात ना तपासणी केली, ना कारवाई. त्यामुळे बीडकरांकडून रोष व्यक्त होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांसाठी १५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले होते. पण व्यापाऱ्यांनी हे आदेश धुडकावले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जे चाचणी न करता दुकाने उघडतील, त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देताच.व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली.
परंतु शहरातील व्यापाऱ्यांची संख्याही जवळपास १० हजारांपेक्षा जास्त आहे. अद्यापही सहा हजार व्यापाऱ्यांनी चाचणी केली नाही, असे असले तरी मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सुभाष रोड, माळीवेस, कारंज, मोंढा आदी भागांतील काही व्यापाऱ्यांनी चाचणी न करताच मंगळवारी दुकाने उघडली. या दुकानांची तपासणी करण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. परंतु दिवसभरात पालिकेने कोणत्याच दुकानांची तपासणी केली नाही
महत्वाच्या बातम्या
- ‘अतिरेकी संघटनांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त केल्याशिवाय जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- 370 कलम रद्द केल्याने कश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचे नगारे वाजवले गेले, पण तसे खरेच झाले आहे काय?’
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
