Share

विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखुन दणदणीत पराभव करत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयानंतर ५ सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी बढत मिळवली आहे. मात्र एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक मोठा पराक्रम केला आहे.

तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. मात्र पहिल्या तीन फलंदाज ६ षटकांच्या आतच माघारी पतरले. मात्र नंतर विराटने कर्णधारपदाला साजेशी अशी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. विराटने पहिले रिषभ पंत बरोबर ४० आणि नंतर हार्दिक पंड्यासह ७० धावांची भागीदारी रचली. कोहलीने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली.

नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत विराटने ५० वेळा नाबाद राहात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. या आधी सचिन तेडुंलकरने ४९ वेळा नाबाद राहात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. त्याच्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनी अर्धशतक करत ४८ वेळा नाबाद राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!