Share

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ औरंगाबादला ट्रॅक्टर रॅली

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने मंगळवारी (दि.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली गेट ते भडकल गेट अशी ट्रॅक्टर रॅली यावेळी काढण्यात आली. शेतकरी विरोधी कायदा रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारून गुन्हे दाखल करण्याचा लेखी इशारा देखील दिला होता. मात्र त्याला न जुमानता ही रॅली काढण्यात आली. दिल्ली गेट येथून दुपारी दोन वाजता रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी तीन कृषी कायदे रद्द करा, विज विधेयक २०२० चे कायद्यात रूपांतर करू नका, किमान हमीभाव मिळण्याचा कायदा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी हरचरण सिंग गुलाटी, जयमाल सिंह रंधवा, कॉ. मनोहर टाकसाळ, इक्बाल सिंग गिल, जकीया बेगम, सरदार हरि सिंग, नवीन ओबेराय, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा सचिव कैलास कांबळे, लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. प्रा.राम बाहेती यांची उपस्थिती होती. वाळूज, तुर्काबाद, खराडी, तळ पिंपरी, शेंदुरवादा, सावखेडा, गाजगाव, वावना, निधोना, आळंद, हातनूर, टापरगाव, कन्नड, मोढा, सिल्लोड आदी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने रॅलीत सहभाग नोंदविला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!