औरंगाबाद : दिड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील एका नवविवाहीतीने मंगळवारी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.अर्पीता वाल्मीक त्रिभुवन (१९) असे या घटनेतील मयत महिलेचे नाव आहे.
खाजगाव ता.गंगापूर येथील अर्पीता हिचा विवाह वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील वाल्मीक भाऊसाहेब त्रिभुवन यांच्याशी एक एप्रिल २०२१ रोजी खाजगाव येथे झाला होता.मात्र विवाहानंतर तिचा हुंड्याचे उर्वरीत तीन लाख रुपये घेण्यासाठी मानसीक व शारीरिक छळ करण्यात येऊ लागला.त्यामुळे या छळास कंटाळून अर्पीता हिने निमगाव शिवारातील गट क्रमांक ५० मधील विहीरीत उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवलीची चर्चा होती.
घटनेची माहीती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांनी घटनास्थळी जाऊन विहीरीतील प्रेत नागरीकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढले.मृतदेहाचे शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी अर्पीता हिचे वडील भाऊसाहेब त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मीक त्रिभुवन, भाऊसाहेब त्रिभुवन, विमलबाई त्रिभुवन या तीन जणांविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शेळके हे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
- राशीद खान दुबईत करतोय मजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते…
- पहिल्याच दिवशी राधेचा धमाका ; दुबईत थिएटरबाहेर रांगा, तर…
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज मिळणार पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

