🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या संसर्गामुळे संपुर्ण देश मोठ्या संकटातून जात आहे. या संकटाच्या काळात देशवासीयांना दोन क्षण मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे बघितले जाते. त्यात सलमान खान सारखा सुपरस्टारचा चित्रपट म्हणजे चाहत्यासाठी पर्वणीच.
काल १३ मे रोजी सलमान खानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. कोरोना संसर्गामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शीत करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाही ‘राधे’ हा तीन चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भारतातील पुर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा राज्यातील चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एसएसएल सिनेमा प्रायव्हेट लिमीटेडचे सीईओ सतादीप सता यांनी त्यांच्या आगरतळा येथील त्यांच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन चित्रपटगृह रुपासी, बालाका आणि धर्मनगर येथे हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.
सलमानच्या चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात ‘झी 5’ वर लॉगिन केल्यामुळे या अॅपचा सर्व्हर डाऊन झाला होता. साधारण तासाभराने अॅप पुन्हा सुरू झाले. तर दुसरीकडे दुबईत ‘राधे’ बघण्यासाठी सिनेमागृहांबाहेर रांगा लागल्या. त्यामुळे पहिल्या दिवशी ‘राधे’चा धमाका बघायला मिळाला.
त्याचबरोबर ओटीटीवरही सलमानच्या चाहत्यांच्या उडय़ा पडल्या आहेत. त्याचवेळी काही युजर्स ‘झी 5 प्रीमियर’वर ‘राधे’ सिनेमा दाखवला जात नसल्याची तक्रार करत आहेत. ज्या लोकांकडे ‘झी 5’ चे सबस्क्रिप्शन आहे त्यांनाही हा सिनेमा बघण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. याबद्दलची नाराजी ट्विटरच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बाप होण्याआधी पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट
- केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिल्या ईदच्या खास शुभेच्छा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

