Share

आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Published On: 

मुंबई : सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचे संकट आहे. अशा काळात रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.

या अनुषंगाने कोरोनासारख्या संकटकाळात आणि अत्यंत तणावाच्या परिस्थितीत अविरत सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सुरक्षेत कुचराई होत असल्यास ते सरकारचे अपयश आहे, अशी मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पोलिसात दाखल गुन्ह्यांचा अहवाल न्यायालयाने मागवला आहे.

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून या न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका डॉ.राजीव जोशी यांनी दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करणाऱ्या सन २०१० च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका या याचिकेत ठेवण्यात आला आहे. यावेळी राज्यभरात हल्ल्यांचे किती एफआयआर दाखल झाले ते न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!