मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. मात्र, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजपच्या प्रयत्नातून मागवण्यात येत असलेले रेमडेसिवीर राज्य शासनालाच मिळणार होते, हे स्पष्ट केले. त्यानंतर भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्याला उत्तर देताना राज्यात मोदी ॲक्ट आला आहे का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय.
केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळू नये यासाठी आदेश दिले असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या विरोधात भाजपच्या वतीने त्यांना माफी मागण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीवरुन पुन्हा एकदा भाजपवर आरोप केले होते. या सर्वात आता राज्याचे मंत्री डॉ. शिंगणे यांनी भाजपच्या मध्यस्थितीने खरेदी होणारे इंजेक्शन रज्यालाच मिळणार होते, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप अधिक आक्रमक झाली आहे. चूकीचे आरोप करणारे मंत्री नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करा, नसता आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. तशी त्यांनी पोलिसात तक्रार देखील दिली आहे. भाजपच्या वतीने या संदर्भात राज्यपालांनाही निवेदन देण्यात आले आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे गंभीर संकट ओढवले असताना काही लोक राजकारण करत आहेत. राजीनामा मागत आहेत. पोलिसात तक्रार करत आहेत. राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यामुळे देशात मोदी ॲक्ट आला आहे का? आणि या कायद्याचे अधिकार महामहीम राज्यपाल महोदयांना देण्यात आले आहेत का? – @nawabmalikncp pic.twitter.com/cEi1H1coxI
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 20, 2021
याला उत्तर देतांना नवाब मलिक म्हणाले की, ‘देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे गंभीर संकट ओढवले असताना काही लोक राजकारण करत आहेत. राजीनामा मागत आहेत. पोलिसांत तक्रार करत आहेत. राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यामुळे देशात मोदी ॲक्ट आला आहे का? आणि या कायद्याचे अधिकार महामहीम राज्यपाल महोदयांना देण्यात आले आहेत का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- सिंघम अजय देवगनची लेक ‘न्यासा’ झाली १८ वर्षाची; अजयने दिल्या खास शुभेच्छा


