Share

गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी जन्माला; हा शेतकरी ठरला भाग्यवान..

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगला फायद्यात पडतो. तुम्ही कधी एकले नसेल, एकाच गायीला २ जुळे वासरे जन्माला आलेली. हो हे खरे आहे. नांदेड जिल्ह्यातील संतराम सुवर्णकार या शेतकऱ्याच्या गायीने दोन जुळे वासरे जन्माला घातली आहेत.

संतराम सुवर्णकार शेतकरी ३ एकर शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहे. यांच्या गायीने जुळ्या वासराला जन्म दिल्याची चर्चा पंचक्रोशीत चांगली रंगली आहे. गायीने जुळ्या वासरांना जन्म दिला, अशा घटना क्विचीतच घडत असतात.
दोन्ही वासरे नर आहेत, व सदृढ आहेत त्यामुळे या शेतकऱ्याला दुध उत्पादनामध्ये चांगला फायदा होणार आहे. जुळ्या वासरांची घटना अगदी कमी वेळात सर्व ठिकाणी पोहचली. ही दोन वासरे रविवारी जन्माला आली. दोन्ही नर आहेत व एकाच रंगाचे देखील आहेत.

या गाईचे दुसरे वेत असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. तसेच गायीचे वय ५ वर्ष आहे, असे सांगितले. शेतकऱ्याच्या कुटुंबाने आयुष्यभर हनुमान मंदिराची सेवा केली. यांच्या आईने देखील चांगली सेवा केली. आता हा शेतकरी थकला असला तरी पूजापाठ काय सोडली नाही. गावकऱ्यांनी हनुमानाचा प्रसाद आहे अशी भावना मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!