Share

‘उद्या पहिला श्रावणी सोमवार ; किमान मंदिरे उघडण्याची घोषणा तरी करायला हवी होती’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. कोरोनाच्या लाटा येत-जात आहेत. कोरोनाची दहशत आपल्याला उलथवून टाकली पाहिजे. काही जिल्ह्यांमध्ये आणखी काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातील निर्बंध पुढील 8-10 दिवसांत शिथिल करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान सध्या राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या लोकलबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातही ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक अॅप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.

परंतु आता यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केले आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. ‘भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली. १५ ऑगस्टपासून रेल्वेबंदी उठवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. या घोषणेचा फज्जा उडणार नाही याची काळजी घ्या. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर बाकी घोषणा होणार. उद्या पहिला श्रावणी सोमवार. किमान मंदिरे उघडण्याची घोषणा तरी करायला हवी होती.’ अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!