🕒 1 min read
मुंबई : एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यभरातील लाखो युवक-युवती अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक वर्षी एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. आता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री- हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सेवा कधी पासून सुरु होणार ?
ही टोल-फ्री हेल्प डेस्क सुविधा उद्यापासून म्हणजेच २ मार्च २०२१ पासून उमेदवारांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येईल. ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी, परीक्षेसंदर्भात शंका व इतर सर्व उमेदवारांच्या अडचणी सोडवण्याचं काम या टोल फ्री सुविधेमार्फत केले जाणार आहे.
टोल-फ्री क्रमांक व सुविधेचा लाभ घेण्यासाठीची वेळ
या टोल-फ्री सुविधेमार्फत माहिती घेण्यासाठी व अडचणी सोडवून घेण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 तर शनिवार, रविवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा उपलब्ध असेल. यासाठी एमपीएससीने उमेदवारांना 1800-1234-275 आणि 1800-2673-889 हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या व्यतिरिक्त support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करताहेत?’, पंकजा मुंडे संतापल्या
- भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी !
- मनसेने ठोकले शाळेला टाळे
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- मोदींनी घेतलेली लस ही प्रसिद्धीसाठी तर पवारांनी घेतलेली लस ही आरोग्यासाठी – मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

