🕒 1 min read
बंगळुरु : कर्नाटकमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने प्रचार सुरु आहे. प्रचारावेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केला आहे. यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक कलह सुरु आहे.
काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला हे भोगावं लागत आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
काँग्रेसने केलेली ही टीका मोदींवर वैयक्तिक टीका असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील भाजपचे प्रवक्ते मालविका अविनाश यांनी ‘काँग्रेस इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतं’, अशी टीका केली आहे. तसंच यावर प्रतिक्रिया दिली जावी इतकीही याची किंमत नसल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
