मुंबई : अमली पदार्थांवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. यातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवत हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून देण्याची मागणी केली आहे. या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा खोचक टोला खोत यांनी लगावला आहे.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठविले आहे. सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची शेती करायची आहे, पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहज मिळत नाही, पण अलीकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत, असंही खोत पत्रात म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
- कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?
- मराठवाड्यातून ८ हजार विद्यार्थ्यांचा आयटीआयला प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
