Share

Aaroh Welankar : “आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे…”, आरोहचे विधान चर्चेत

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेगळे वळण आले आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या गटाने न्यायालयामध्ये धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शवला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेता आरोह वेलणकरने या सगळ्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. सध्या हे वक्तव्य खूप चर्चेत आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आरोह म्हणाला, ‘शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांनीही सेनेला भरभरून दिले आहे’.

https://www.instagram.com/p/Ce0wATuqmX-/

आरोहचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. आरोह सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो . तो कायम राज्यातील राजकारणावर त्याचे मत मांडत असतो. आपल्या वक्तव्यांमुळे आरोह वेलणकर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!