टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार मोठ खिंडार पडले आहे. इचलकरंजी येथील नगरपालिकेतील गटनेत्यासह पाच नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला आहे. तसेच शिवसेना अजूनच मजबूत झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा गट लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. तसेच रामराजे आणि उदयनराजे हेही भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
- राष्ट्रवादीच्या फलकावरून भुजबळ पिता पुत्र गायब
- युतीची घोषणा कधी ही होवू शकते, मुख्यमंत्र्याचे सूचक वक्तव्य
- विधानसभेची चुरस वाढणार, ‘आप’ही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
- अमित शहांच्या उपस्थितीत होणार राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्यांचा भाजपप्रवेश ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

