🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदान सोमवारी पार पडले आहे, आता सर्वांचे लक्ष पुढील टप्यातील मतदारसंघात लागले आहे, सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका सभेत तृणमूल कॉंग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचं सांगितल होत. आत तृणमूलकडून मोदींवर पलटवार करण्यात आला आहे.
मोदींचा उल्लेख एक्स्पायरी बाबू करत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी टीका केली आहे. मोदींची एक्स्पायरी डेट जवळ आली असून तुमच्यासोबत साधा नगरसेवकही येणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी केली आहे. मोदी हे प्रचार करतायत की घोडेबाजार असा सवाल देखील विचारण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल आमदारांबद्दल केलेल्या विधानाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं ओब्रायन यांनी म्हंटले आहे.
Expiry Babu PM , let’s get this straight. Nobody will go with you. Not even one councillor. Are you election campaigning or horse trading! Your expiry date is near. Today, we are complaining to the Election Commission. Charging you with horse trading #LokSabhaElection2019
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) April 29, 2019
नेमक काय म्हणाले होते नरेंद्र मोदी
ममता बॅनर्जी यांना दीदी म्हणत,मोदी यांनी २३ मे ला जेव्हा निकाल लागेल, तेव्हा भाजपाचे कमळ सर्वत्र उगवेल आणि तुमचे आमदार तुम्हाला सोडून जातील असा इशारा दिला. याचबरोबर आजही ममता यांचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
