लातूर: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकुण ४६२ रुग्णांची आजतागायत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कान नाक घसा विभागामध्ये आजपर्यंत एकुण ४४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी म्युकरमायकॉसिस या आजाराच्या १०० रुगणांवर या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आला असुन सद्यस्थितीत ४६ रुग्ण कान नाक घसा विभागामध्ये दाखल आहेत. या आजाराची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ८१ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.
तपासणी व उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ७२ रुग्णांना शुगर होती, ८२ रुग्णांना कोविड उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर करण्यात आला होता व ७ रुग्णांना इतर अजार होते. आजपर्यंत ५५ रुग्णांवर नाकाच्या श्वास घेण्याच्या ठिकाणच्या हवेच्या पोकळया म्हणजे सायनस काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ४४ रुग्णांवर टाळुचा जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच २ रुग्णांवर डोळयाच्या खालील हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असेही डॉक्टर देशमुख यांनी सांगितले.
तसेच आजतागायत १८ रुग्णांना डोळयाच्या पाठीमागे अंफोटेरीसीन बी इंजेक्शन देऊन रुग्णांच्या डोळयांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत व ६ रुग्णांमध्ये बुरशी बाधीत डोळा काढुन टाकण्यात आला आहे. म्युकरमायकॉसिस या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे अंफोटेरीसीन बी इंजेक्शन हे रुग्णसंख्येच्या आवश्यकतेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडुन नियमितपणे पुरवठा केला जातो.
आजपर्यंत एकुण १३०६ इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला असुन १६० इंजेक्शन हे सद्यस्थितीत या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामधील म्युकरमॉयकोसिसची लागण झालेल्या एकुण १२ रुग्णांचा मृत्यु झाला असुन त्यापैकी ९ रुग्णांचा मृत्यु हा कोव्हिड नंतरच्या गुंतागुंतीच्या आजारामुळे झाला असुन ३ रुग्णांच्या मेंदुमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मृत्यु झाल्याची माहिती डॉक्टर देशमुख यांनी दिली.
काळया बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, दात हलु लागणे व टाळुला जखम होणे अशी आहेत. ही लक्षणे दिसुन येताच रुग्णांनी तात्काळ कान नाक घसा विभागामध्ये तपासणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ. सुधीर देशमुख, विभागप्रमुख कान नाक घसा डॉ. विनोंद कंदाकुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे,विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ. शैलेंद्र चौहाण, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभागडॉ. निलिमा देशपांडे, विभागप्रमुख दंतचिकित्साडॉ. रितेश वाधवानी, सहयोगी प्राध्यापक नेत्रविभागडॉ. नंदकुमार डोळे, डॉ. प्रदीप खोकले यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या आवाहनावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमके आहे तरी काय ?
- इंग्लंडला नमवून डब्ल्युटीसी फानयलसाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
