🕒 1 min read
मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सातत्याने सुरू आहेत. शिवाय मलिक हे समीर यांच्या पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावरही निशाणा साधत आहे. या सर्व घडामोडीनंतर क्रांती रेडकर यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. दरम्यान, या पत्रामुळे आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी क्रांतीवर निशाणा साधला आहे.
याविषयी बोलतांना मनिषा म्हणाल्या की,’समीर वानखेडे जेव्हा छापेमारी टाकायला जातात, तेव्हा मीडियाला घेऊन जातात. त्यामुळे सगळ्या गोष्टी लोकांना कळतात. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया येणारच. आता अचानक क्रांती रेडकर यांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बाकिच्या गोष्टी आठवतात, हे उल्लेखनीय आहे. त्यांच्या पत्रावर मुख्यमंत्रीच योग्य निर्णय घेतील.’
दरम्यान, ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वेळ मिळावी यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना विनंती केली आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यासोबत उद्धव ठाकरेंचे आणि त्यांचेही संबंध चांगले आहेत. त्यामुळे आमच्या ज्या काही समस्या आहेत, त्या मांडण्यासाठी मला फक्त दोन मिनिटांची वेळ हवी आहे, यासाठीच मी हे पत्र लिहिले आहे. त्यामुळे ती वेळ मिळेल आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल अशी आशा करते,’ असे क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- ’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- ‘समीर वानखेडे मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय’

