औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयास तीन स्कॉर्पिओ वाहने वितरित करण्यात आली. ही वाहने बुधवारी (दि.२) आरटीओ कार्यालयाच्या ताफ्यात पोहोचली असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांच्या हस्ते या वाहनांची पूजा करण्यात आली. या वाहनांमुळे आरटीओला मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
प्रादेशिक परिहवन कार्यालयात फिरत्या पथकासाठी दोन वाहनांची व्यवस्था होती. जिल्ह्यातील वाहनांची संख्या ही जवळपास १६ लाखांच्या आसपास गेली आहे. त्यामुळे वाहनांच्या तपासणीसाठी फिरआरटीओत्या पथकात आणखी वाहनांची व्यवस्था गरजेची होती. तसेच या पूर्वीच्या वाहनांची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने ३ अतिरिक्त स्कॉर्पिओ वाहनांचा आरटीओच्या ताफ्यात समावेश केला आहे.
या नवीन अत्याधुनिक वाहनांमध्ये स्पीडगनची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा तपासण्याचे काम सोप्या पद्धतीने होऊन सुसाट धावणाऱ्या वाहनांना चाप बसणार आहे. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, वाहन निरीक्षक योगेश सरोदी आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग; सुशिक्षित लोकांसह महिलांनाही दिली जाणार संधी
- एसबीआयच्या नावाने ‘हा’ मेसेज आल्यास व्हा सावध!
- अनिल देशमुखांना हाय कोर्टाचा दणका; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
- प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन सेनेला मराठवाड्यात आणलं- चंद्रकांत पाटील
- सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच शेहनाजला बसला धक्का

