Share

गंगाखेडच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन जणांना अटक, पिस्तूलही केले जप्त

Published On: 

🕒 1 min read

परभणी : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी गंगाखेडातील व्यापार्‍यास लुटणार्‍या तीन जणांना गुरुवारी अटक केली आहे. आरोपींकडून एक पिस्तूल व 1 लाख 3 हजार चारशे रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

गंगाखेडचे व्यापारी अनिल यानपल्लेवार हे दुकान बंद करून घरी जात असताना तीन जणांनी मंगळवारी (दि.2) रात्री साडेनऊ वाजता त्यांना रस्त्यात अडवून त्यांची पैशांची बॅग लांबवली होती. बॅगमध्ये 1 लाख 95 हजार 500 रुपय होते. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करण्याचे आदेश दिले. यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी दोन पथके तपासासाठी पाठवली.

आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपींनी गंगाखेडात गुन्हा केल्यानंतर तुळजापूर येथील एका धाब्यावर त्यांच्याजवळील बंदुकीतून फायरिंग केली होती. याबाबत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील एक आरोपी उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतला असून अन्य आरोपींच्या शोधात ते होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी हे पुणे येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ पुण्याकडे रवाना झाले. तेथे पोलिसांनी शिताफीने आरोपींना अटक केली. आरोपींजवळून पिस्तूल तसेच चोरलेल्या पैशांपैकी 1 लाख 3 हजार चारशे रुपये जप्त करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी फौजदार साईनाथ पुयड, हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, किशोर चव्हाण, अजहर शेख, हरिचंद्र खुपसे, शेख मोबीन, संतोश सानप, छगन सोनवणे, संजय घुगे, पिराजी निळे तसेच सायबर शेखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांनी कामगिरी पार पडली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!