🕒 1 min read
ठाणे- ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी सहा महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता.
विशेष म्हणजे मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. दरम्यान, सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणात तिघा पोलिस शिपायांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- धक्कादायक! राजेश टोपे यांच्या बैठकीत शेतकऱ्याने केले विष प्राशन
- हाथरस प्रकरण : पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्या ‘आप’च्या खासदारावर फेकली शाई
- #IPL2020 : दिल्ली-हैदराबादला मोठा धक्का ;दुखापतीमुळे दोन दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर
- ‘दानवे किती रस्त्यावर असतात हे सर्वांना माहित आहे’ ; बाळासाहेब थोरातांचं प्रत्युत्तर
- ‘आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
