Share

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू

Published On: 

मुंबई : निकृष्ट दर्जाचे रस्ते, बेशिस्त वाहन चालक या कारणामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघातामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. आज सकाळीच सहा वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

बोरघाटजवळ तीन कार, एक खासगी बस, एक टेम्पो आणि एक ट्रेलर अशी सहा वाहने एकमेकांवर    जोरदार आदळल्याने यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झालेली आहेत. या अपघातानंतर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून या अपघातातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.

सर्वात आधी एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोंबड्यांनी भरलेल्या ट्रकला धडकल्याने मागून येणारा एक भरधाव ट्रेलर कारला धडकला. यामुळे कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमधील तिघाचांही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. या प्रसंगी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!