🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य सरकारने दिलेल्या सीएसआर निधीतून महापालिकेने दोन कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी दीड कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून या कार्डियाक रुग्णवाहिका पालिकेच्या यांत्रिकी विभागात दाखल झाल्या आहेत. तसेच आणखी सहा साध्या पध्दतीच्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आल्या आहेत. या सहा रुग्णवाहिका आठवडाभरात पालिकेत दाखल होतील, असे कार्यकारी अभियंता पंडित यांनी सांगितले.
औरंगाबाद पालिकेला राज्य सरकारकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी सीएसआरमधून दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या निधीतून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पध्दतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी आरोग्य विभागातून जे.एम. पोर्टलवरून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पध्दतीच्या रुग्णवाहिकांच्या खरेदीची प्रक्रिया राबवली.
तब्बल सहा महिन्यानंतर दोन कार्डियाक रुग्णवाहिका शुक्रवारी (दि.२) पालिकेच्या यांत्रिकी विभागाला मिळाल्या आहेत. यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. पंडीत यांनी दोन्ही कार्डियाक रुग्णवाहिकांमध्ये यंत्रसामुग्री बसविण्यासाठी मुंबईला पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यंत्रसामुग्री बसविल्यानंतर आरटीओ पासिंग करुनच आरोग्य विभागाला वापरण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका मिळतील, असे त्यांन स्पष्ट केले. यापूर्वी देखील पालिकेने अधिकारी-कर्मचारी यांच्या निधीतून एक कार्डियाक आणि दोन साध्या रुग्णवाहिकांची खरेदी केलेली आहे. कार्डियाक रुग्णवाहिका मेल्ट्रॉन येथे तर दोन साध्या रुग्णवाहिका एन-८ आणि पालिका कार्यालयात कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्धीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करणारे सरकार तिजोरीत खडखडाट असल्याचा कांगावा का करत आहे ?
- सई ताम्हणकरचा ‘देसी लुक’ पाहून अनेकजण झाले घायाळ; पहा फोटो
- भाजपची गुंडगिरी खपवून घेणार नाही, नवाब मलिकांचा थेट इशारा
- राज्य सरकारकडून वारकऱ्यांचा छळ करून अटक, ही बाब निंदनिय: खा. इम्तियाज जलील
- ‘माझ्या घोषणांमुळे उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या म्हणून माझे निलंबन’; राम सातपुतेंचा घणाघात

