औरंंगाबाद : उस्मानपुरा परिसरातील वनविभागाच्या वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात दारू पिण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून तीन जणांनी अप्पासाहेब दादासाहेब तागड (वय ४५,रा. हडको, एन-११) या वनविभागाच्या कर्मचा-यास शिवीगाळ करून मारहाण केली.
ही घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी कुलभूषण किर्तीशाही, रंजित मनोरे, राहुल पवार यांच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, तागड यांना सहा तारखेला मारहाण करून फरार असलेले तिघे शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा लावत मोठ्या शिताफीने तिघांना अटक केली. कार्यालयाच्या आवारात दारू पिऊ न दिल्याचा राग तिघांना आला होता. त्यानंतर मारहाण करीत तिघे फरार झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

