Share

‘प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी, चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा; राज्यात कायदा सुव्यवस्थेची भयानक स्थिती’

Published On: 

मुंबई : टोकियो ऑलिंपिकमध्ये तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवच्या कुटुंबीयांना घर बांधकामावरुन शेजाऱ्यांकडून धमकी देण्यात आली आहे. या कुटुंबाच जेसीबीने घरच उद्ध्वस्त करण्याची धमकी काहीगाव गुंडांनी दिली. तर दुसरीकडे भारतीय जनात पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वाघ यांनी बदनामी केल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

या दोन प्रकारांमुळे भाजपाने महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. ‘प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी, चित्रा वाघ यांच्यांवर गुन्हा; राज्यात कायदा सुव्यवस्थेची भयानक स्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

‘गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलजी, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची ही भयानक स्थिती आहे तिरंग्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी? गुंडगिरीला वैतागून गाव सोडण्याची तयारीत आहेत. तर अन्यायाविरोधात बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा याकडे लक्ष द्या’ असे ट्विट उपाध्ये यांनी केले आहे.

प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी
सातारा जिल्ह्यातील सरडे येथील घराची दुरुस्ती करू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी प्रवीणच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली होती. भारतात परतल्यानंतर प्रवीणच्या आईने त्याला ही माहिती दिली. प्रवीणच्या घरी आई-वडील, चुलती व चुलतभाऊ असे ४ जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये राहते. स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना ८४ गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले. त्याठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध आहे. या विरोधातून दोन दिवसापूर्वी दोन्ही कुटुंबात वाद झाला. शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत आहेत. शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने प्रविण जाधवचे दोन खोल्यांचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली.

चित्रा वाघ यांनी मला बलात्कारी म्हटले, माझी बदनामी केली-मेहबूब शेख
चित्रा वाघ शिरुर कासारमध्ये (जि.बीड) येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ १८ जुलै रोजी शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला अत्याचारी म्हटले तसेच माझ्यावर खोटे आरोप लावल्याचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानूसार वाघ यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मेहबूब शेख यांच्याविरोधात एका युवतीने अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने वाघ यांनी टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!