Share

स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात असलं तरी कुठं जायचं हे मागे बसलेले ठरवतात: देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई: विरोधी पक्ष भाजपा आणि महाविकास आघाडीमधले राजकारण चांगलेच तापलेले सद्या दिसत आहे. तर राजकीय टीका-टिप्पण्यांची धुळवड चालू असल्याचे चित्र उभे राहत आहे. कोरोना सारख्या भयानक रोगाच्या काळात देखील राजकारण मात्र कुठेही थांबलेलं दिसत नाही. आज महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत बोलत असताना देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हि संधी सोडली नाही.

“उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो” अशा शुभेच्छा देत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली. यानंतर हे तीन चाकी सरकार असून जास्त काळ टिकणार नाही यावर प्रत्युत्तर देताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘हे तीन चाकी सरकार असून सामान्य जनतेच्या हिताचे सरकार आहे, ज्याचं स्टेअरिंग माझ्या हातात असून मागे दोघे नीट बसले आहेत,’ असे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सेनेच्या ठाकरेंच्या विरोधात काँग्रेसचे ठाकरे, मुंढे प्रकरणात असा रंगणार सामना…

तर, यावर पुन्हा फडणवीस यांनी आज भाष्य करत, ‘ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात,’ असा टोला देखील लगावला आहे. तसेच, ‘ “आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे” असेही फडणवीस म्हणाले.

‘काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड भेद याचा वापर करत आहे’

तसेच, “कोरोना टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत, मात्र आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, पण महाराष्ट्र्र याबाबत 19 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत टेस्ट होत नाहीत, कारण त्यावर निर्बंध घातले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे. सेकंड वेव्ह आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते” असा दावाही फडणवीसांनी केला. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.

आपले शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मोदींचे मानले आभार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!