Share

सेनेच्या ठाकरेंच्या विरोधात काँग्रेसचे ठाकरे, मुंढे प्रकरणात असा रंगणार सामना…

Published On: 

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर महानगर पालिकेत सुरू असलेले शीतयुद्ध आता चव्हाट्यावर आले आहे. महापौर संदीप जोशी यांनी आत्तापर्यंत अनेकदा तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेतच, पण या वादाला आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असे वळण येण्याची शक्यता आहे.

दै . सामनासाठी खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ज्यात त्यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा थेट काँग्रेसचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांनीच विरोध केला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे प्रकरणात नागपूर महानगर पालिकेतील वादाला नवे वळण येण्याची शक्यता आहेच, शिवाय हा वाद आता सेनेच्या ठाकरेंविरुद्ध काँग्रेसच्या ठाकरेंमध्ये देखील रंगू शकतो.

नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. स्मार्ट सिटी प्रकरणात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील तुकाराम मुंढेंच्या विरोधान नाराजी व्यक्त केली होती. अशात तुकाराम मुंढे जे दाखवतात ते प्रत्यक्षात कधीही होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.

नागपूर महापालिकेत नेमके काय सुरू आहे, याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे विकास ठाकरे म्हणाले. नाण्याची दुसरी बाजू आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू, लोकप्रतिनिधींचे कुठे चुकले, जनतेचे कुठे चुकले हे सगळे मुख्यमंत्र्यांसमोर मांडू तेव्हा त्यांचा मुंढेंकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असा विश्वास व्यक्त करताना विकास ठाकरे यांनी मूळ वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

#व्यक्तीविशेष : उद्धव ठाकरे – एक छायाचित्रकार मुख्यमंत्री कसा बनला ?

…ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी; पाटील, फडणवीसांना आंबेडकरांचा खोचक सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!