Share

ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी- मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला.

यावेळी शिवसैनिकांचे प्रतिपादन करत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,’ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी. लढाई निर्णायक निष्ठेने लढायची असते. सहकारात आपण काय करतो? गावात संस्था निर्माण कराव्यात, परंतु नियमबाह्य काहीही करू नये. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा’, असे ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,’यापुढील सर्व निवडणुका या जिंकण्यासाठी लढायच्या. निवडणुकीत अजिबात निष्काळजीपणा आणि फाजील आत्मविश्वास नको.’ तसेच आज महाराज रायगडावर आहे ते आपल्याला पाठीवर थाप देतील. आजही बाळासाहेब आपल्यातच आहेत. आपण असं काय केलं तर ते आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील असा रोज विचार करा’, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!