🕒 1 min read
मुंबई : दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आला. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा आनंद शिवसेनेकडून साजरा केला जात असतानाच भाजपकडून शिवसेनेच्या विजयावर टीका करण्यात आली. महाराष्ट्राच्या बाहेर एक खासदार काय निवडून आला शिवसेनेच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागली आहेत, अशी टीका भाजपकडून केली गेली. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपवाल्यांना शिवलेले कोट 2024 नंतर भांडीवाल्याला द्यावे लागतील, पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट 2024 साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
100 रुपये दर वाढवले आणि आता फक्त पाच रुपये कमी केले आहेत. खरं तर इंधनाच्या भाववाढीतून बेहिशेबी पैसे केंद्र सरकारने कमावले आहेत. करायचे होते तर केंद्राने 25 रुपये कमी करायला हवे होते. याचं कारण असं आहे की, केंद्र सरकारचं मोठं मन नाहीये. कुजकं आणि सडकं आहे. पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे पेट्रोलचे दर कमी केला, असा दावा राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
- भाजप नेत्याची दादागिरी; काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळू दिला नाही म्हणून हवालदाराच्या लगावली कानशिलात
- द्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
