नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यामधली कोंडी अद्याप कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना कृषी कायद्यां विरोधातील आंदोलनावर मौन सोडलं.
‘देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. त्यापासून देशातील जनतेने सावध राहायला हवं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हे आंदोलनकर्ते वकिलांच्या आंदोलनात असतात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात,’ असे मोदींनी म्हटले. ‘सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात,’ असा टोला मोदींनी लगावला आहे.
नरेंद्र मोदींच्या आंदोलनजीवी या शब्द प्रयोगानंतर विरोधी नेत्यांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी देखील मोदींवर खोचक टीका केली आहे. ‘क्रॉनीजीवी आहेत ते, जे देशाला विकत आहेत.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. तर, केंद्र सरकारचे आणि उद्योगपतींचे लागेबांध असल्याची टीका देखील राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणूक कमी करुन त्या कंपन्या खासगी उद्योगपतींच्या घशात घालत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाहीत, अजितदादांचा राज्यपालांना सूचक इशारा !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- …तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला देखील अटक करावी; फडणवीस कडाडले
- नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं; नाना पटोलेंची खोचक टीका
- १० रुपयांच्या रिचार्जमुळे ४९ हजार गेले, काँग्रेसच्या माजी खासदाराला ऑनलाईन गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
