🕒 1 min read
बीड : राज्यातील भाजप नेते राज्यात सत्तांतर होणार असल्याचे नेहमीच सांगत असतात. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार अधिक काळ टिकणार नाही, असे सूचक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले होते. रवी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले होते.
भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीदरम्यान रवी म्हणाले की, ‘राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही’ असे रवींनी स्पष्ट केले होते.
दरम्यान आता आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. ‘आमच्याकडे ज्योतिषी नाही, त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते त्यांचा अंदाज वर्तवत असतात. पण हवामान खात्यासारखं त्यांचं ज्योतिष्य आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती आधार आणि महत्व द्यायचं, सरकार जाणार असं म्हणून दोन वर्ष गेली पण सरकार टिकलं आहे आणि पुढेही टिकेल. पण सरकार जावं म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवणारे स्वतःच पाण्यात जातील,’ असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
